औरंगाबाद : मुंबई पुण्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेल्या कोरोनाने मराठवाड्याच्या राजधानीत चंचूप्रवेश केला असून रविवार, 5 एप्रिल रोजी 5 नव्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, आता औरंगाबादेतील कोरोना बाधितांची संख्या 8वर पोहोचली आहे. नव्या 5 रुग्णांमध्ये एका उच्चपदस्थ अधिकार्याच्या गाडी चालकाचा समावेश असल्याने आता अधिकारी, कर्मचारीवर्गांमध्येही खळबळ उडली आहे. यातच अत्यावश्यक सेवा पुरवणार्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.