आमच्या विषयी

गेल्या 24 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पत्रकारितेची आवड असल्यामुळे अंबाजोगाईत महाविद्यालयात असतानाच 1989-90 मध्ये भरारी प्रतिनिधी पत्रकारितेस सुरूवात. 1997 मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एम.फील. ला असताना आपलं महानगर (औरंगाबाद) मध्ये प्रशिक्षणार्थी उपसंपादक म्हणून रूजू. त्यानंतर मग मागे वळून पाहण्याची वेळच आली नाही. 1998 मध्ये दै.मराठवाडा मध्ये उपसंपादक म्हणून काम सुरू. 1999 ला दै.सकाळ मध्ये बातमीदार/उपसंपादक म्हणून रूजू. त्यानंतर दै.लोकमत, दै.पुढारी मध्ये 2011 पर्यंत काम केले. जानेवारी 2011 मध्ये दै.भास्कर समूहाच्या दै.दिव्य मराठी मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून काम केले.

दै.दिव्य मराठी औरंगाबादेत सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रातून पहिली नियुक्ती मिळवण्याचा मान मिळाला. दै.दिव्य मराठीने मराठी पत्रकारितेत आणलेले नवीन प्रवाह याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले. जून 2018 पर्यंत दै.दिव्य मराठीत काम केल्यानंतर पुन्हा दै.पुढारी (पुणे) मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून रूजू. हा प्रवास मार्च 2020 पर्यंत सुरू होता. दरम्यानच्या काळात सोशल मीडिया व पत्रकारितेचे बदललेले स्वरूप हे काही स्वस्थ बसू देत नव्हते. नवीन काहीतरी करायला पाहिजे, असं सारखं वाटत असल्यामुळे एप्रिल 2020 मध्ये maharashtratoday.live हे न्यूज व मीडिया वेब पोर्टल सुरू केले.

सोशल मीडिया व बदलत्या काळानुरूप पत्रकारितेतही मोठे बदल झाले आहेत. विविध वाहिन्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलीही बातमी आता दबून राहत नाही. घटना घडताच काही मिनिटात ती वाचकांपर्यंत पोचते. या बदलत्या काळात वाचकांना काहीतरी नवीन सातत्याने दिलं पाहिजे. त्यांच्याशी निगडीत त्यांना दैनंदिन जीवनात याचा उपयोग होईल, असं देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्याचा प्रयत्न सरु आहे. माहिती मनोरंजन व प्रबोधनात्मक लेख, साहित्य विश्वातील घटना घडामोडी, निवडक ठळक घटना घडामोडी वाचकांना देण्याचा हा छोटासा प्रयत्न…
-विलास संतराम इंगळे, (एम.ए., बी.जे., एम.ए.सी.जे.)
संपादक: maharashtratoday.live
मोबाईल: 9422210423
ईमेल: vilas.single@gmail.com