औरंगाबाद : कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढाईत जीव धोक्यात घालून लढणाऱ्या पोलिसांवर औरंगाबादेत हल्ला करणाऱ्या तीन समाजकंटकांना पोलिसांनी अटक केली असून, दोनजण फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या गुंडांच्या जीवघेण्या हल्ल्यात दोन वाहतूक पोलिस जखमी झाले आहेत.
औरंगाबादेत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना वाहन का अडवले या कारणावरून पोलिसांवर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे चौकात काही गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. हल्ला करून हे पाच हल्लेखोर पसार झाले होते. त्यापैकी तीन जणांना पोलिसांनीअटक केली असून दोन फरार गुंडांचा शोध घेण्यात येत आहे.