औरंगाबाद: जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज शनिवारी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडये यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू संसर्ग आणि त्याच्या विरुद्ध लढ्याबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी औरंगाबाद मनपास सर्वतोपरी मदत देणार असल्याचे सांगितले.
या वेळी आयुक्त यांनी औरंगाबाद महानगरपालिकातर्फे करण्यात आलेल्या उपाय योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी पालकमंत्री यांनी औरंगाबाद मनपास जिल्हा प्रशासन आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत पाहिजे ती मदत आणि निधी देण्याचे आश्वासन दिले. या शिवाय जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याशी फोनवरून परिस्थिती चा आढावा घेतला.