# गुडफ्रायडे, इस्टर प्रार्थनेचे थेट प्रक्षेपण ; घरात बसून ऐका धर्मगुरूंचा संदेश.

मुंबई : कोरोनोचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातल्याने या आठवड्यात होणाऱ्या गुडफ्रायडे व इस्टर सणावर निर्बंध आले आहेत. परंतु यावर मार्ग म्हणून या सणानिमित्त होणाऱ्या प्रार्थनेचे व धर्मगुरुंच्या संदेशाचे विविध वाहिन्याद्वारे थेट प्रेक्षेपण केले जाणार असून, ख्रिश्चन बांधवांना आपल्या घरी बसून त्याचा आनंद घेता येणार आहे.
ख्रिश्चन धर्मियांच्या चाळीस दिवसांच्या उपवासाची सांगता गुडफ्रायडेच्या (दि. १०) सायंकाळच्या प्राथर्ननेनंतर होते. त्यानंतर इस्टरच्या (दि.११) पूर्वसंध्येला मध्यरात्री आनंदोत्सव साजरा केला जातो. या सणानिमित्त चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनामुळे या सणावर निर्बंध आले असले तरी यावर मार्ग म्हणून धर्मगुरुंच्या संदेशाचे व्हिडीओ चित्रिकरण केले जाणार आहे. ते विविध मराठी वाहिन्यांवरून प्रसारित करावे, अशी मागणी गोरेगाव येथील टी. जे. गलबाव व ख्रिश्नच धर्मगुरुंनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली होती. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व वाहिन्यांच्या संपादकांशी चर्चा केली आहे. या निमित्ताने ख्रिश्चन धर्मगुरुंनी श्री. देसाई याचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *