# ग्राहकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई; जिल्हा प्रशासनाकडून किराणा साहित्याची दरसूची जाहीर.

 

संग्रहित छायाचित्र

पुणे : सध्या लॉकडाऊन व संचारबंदीच्या अनुषंगाने सर्वसामान्य ग्राहकांना भाजीपाला, किराणा साहित्य वाजवी दरात मिळावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही शहरातील अनेक भागांमध्ये किराणा साहित्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ज्या भागात किराणा दुकाने आहेत,  ते दुकानदार अवास्तव किंमत आकारून सर्वसामान्यांची लूट करत असल्याच्याही तक्रारी येत आहेत.

शहरातील काही भागात तर अशी परस्थिती निर्माण झाली आहे, की पैसे असूनही किराणा साहित्य मिळत नाही, भाजी मिळत नाही. जे किराणा साहित्य मिळते त्यासाठी काही दुकानदार अव्वाच्या सव्वा दर आकारून ग्राहकांची लूट करत आहेत. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने किराणा साहित्याची दरसूची प्रकाशित केली आहे. किराणा व औषधे त्याच्या किमतीपेक्षा जास्त पैसे घेतले जात असतील तर तत्काळ कळवण्याचे आवाहन करण्यात आले असून, तक्रार दाखल करण्यास संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. किराणा व मेडिकलवाला किमतीपेक्षा जास्त पैसे घेत असेल तर 8130009809 या क्रमांकावर तत्काळ तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

किराणा वस्तुचे भावफलक

१)साखर             35 रू किलो

२)गुळ              45 रू किलो

३)शेंगदाणे          100 रू किलो

४)तेल               95 रू किलो

५)खोबर            170 रू किलो

६)हरबरा डाळ        60 रू किलो

७)मठ डाळ          100 रू किलो

८)तूर डाळ           90 रू किलो

९)मूग डाळ          105 रू किलो

१०)साबुदाणा          70 रू किलो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *