नवी दिल्ली : देशात लॉकडाऊन ३ मेपर्यंत लागू राहील. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक भागाची बारकाईने पाहणी केली जाईल. ज्या भागात कोरोनाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न होईल. जो भाग या अग्निपरीक्षेत यशस्वी होईल, त्यांना २० एप्रिलनंतर काही अत्यावशक सेवेसाठी सशर्त अनुमती दिली जाईल. बाहेर पडण्यासाठी कडक नियम राहतील. लॉकडाऊनचे नियम तुटले तर सर्व परवानगी मागे घेतली जाईल. बेजबाबदार वागू नये, इतरांनाही बेजबाबदारपणे वागू देऊ नये, असे आवाहन आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केले.
१४ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर आज त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. ते म्हणाले, यापूर्वी जसे आपण नियम पाळत होता, तसेच यापुढे नियम पाळावेत. कोरोनाला कुठल्याही किमतीत आम्हाला रोखायचे आहे. नव्या ठिकाणी कोरोना होऊ नये, यासाठी काळजी घेतली पाहीजे. कुठेही कोरोनाने मृत्यू होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. यावेळी अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे. नवे हॉटस्पॉटमुळे नवे संकेट निर्माण होण्याची भीती आहे.
आज जगभरात कोरोना महामारीने उच्छाद मांडला आहे. इतर देशाच्या तुलनेत भारताने हा आजार रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. आपल्याकडे जेव्हा एकही रुग्ण नव्हता तेव्हा आपण विमानतळावर स्कॅनिंग सेवा सुरू केली होती. विदेशातून येणाऱ्या प्रत्येकाला चौदा दिवसांचे विलग ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. जेव्हा आपल्याकडे ५२५ केस झाल्या. त्यावेळी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. या संकटात कुठलाही देशासोबत तुलना करणे योग्य ठरणार नाही. तरीही काही वस्तूस्थिती टाळता येणार नाही. जगातील अनेक बलाढ्य देशातील आकडेवारी पाहता भारतातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसते. महिनाभरापूर्वी काही देश भारतासोबत होते. आज भारताच्या तुलनेत त्या देशांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली आहे. काही देशात हजारो मृत्यू झाले आहेत. भारताने एकत्रित प्रयत्न केल्यामुळे आज स्थिती समाधानकारक आहे.
सामाजिक अंतर आणि लॉकडाऊनचा देशाला मोठा फायदा झालेली आहे. आर्थिकदृष्ट्या आपल्याला फटका बसला आहे, हे मान्य आहे. परंतु जीवन महत्वाचे आहे, हेही विसरून चालणार नाही. या संकटकाळात राज्य, स्थानिक संस्थांनी मोठी जबाबदारीने काम केले आहे. परिस्थिती नॉर्मल ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. या परिस्थितीतही कोरोनाचा ज्याप्रकारे फैलाव होत आहे त्याने जगाला आणि सर्व शासनाला सतर्क केले आहे.
यावेळी अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे. नवे हॉटस्पॉटमुळे नवे संकट निर्माण होण्याची भीती आहे. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक भागाची बारकाईने पाहणी केली जाईल. ज्या भागात कोरोनाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न होईल. जो भाग या अग्निपरीक्षेत यशस्वी होईल, त्यांना २० एप्रिलनंतर काही अत्यावशक सेवेसाठी सशर्त अनुमती दिली जाईल. बाहेर पडण्यासाठी कडक नियम राहतील. लॉकडाऊनचे नियम तुटले तर सर्व परवानगी मागे घेतली जाईल. बेजबाबदार वागू नये, इतरांनाही बेजबाबदारपणे वागू देऊ नये.
या संदर्भात उद्यापासून सरकारकडून विस्तृत सूचना दिल्या जातील. प्रधानमंत्री गरीब न्याय मंत्री योजनेतून गरीबांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनात या घटकांना सूट देण्याचा विचार आहे. रब्बी हंगाम संपण्याचा मोसम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष सवलत देण्याचा विचार आहे. अन्नधान्य पुरवठा मुबलक आहे. २२० लँबमध्ये टेस्टिंग केली जाईल. कोरोनाचे १० हजार रुग्ण झाल्यानंतर १५०० बेडची गरज भासते. भारतात एक लाख बेडची सोय केली आहे. ६०० हून अधिक रुग्णालये कोविडवर काम करत आहे. या ठिकाणी आणखी सुविधा दिल्या जातील. भारतातील तरुण वैज्ञानिकांना माझे आवाहन आहे की त्यांनी पुढे यावे. वैज्ञानिकांनी यावर लस शोधण्यासाठी पुढे यावे.
मोदींची सप्तपदी
१) ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.
२) सोशल डिस्टंसिंगचे महत्व पाळा
३) मास्कचा उपयोग करा.
४) प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाचे निर्देश पाळा
५) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेतू मोबाईल अँप डाऊनलोड करा
६) जेवढं शक्य आहे तेथे गरीब परिवाला मदत करा
७) आपला व्यावसाय, उद्योगामध्ये काम करणाऱ्यांना सहानुभूती दाखवा, नोकरीवरून काढू नका.
कोरोना योद्धा पोलिस, नर्सेस आणि इतराचा सन्मान करा.