# पुणे विभागात आजपर्यंत एकूण 52 रुग्णांचा मृत्यू; 646 कोरोनाबाधित.

 

पुणे: विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 646 झाली आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 520 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 646 बाधित रुग्ण असून 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 589 बाधित रुग्ण असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 11 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 14 बाधित रुग्ण असून 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 26 बाधित रुग्ण असून कोल्हापूर जिल्ह्यात 6 बाधित रुग्ण आहेत.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 8 हजार 188 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 7 हजार 600 चा अहवाल प्राप्त झाला आहे. 588 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 6 हजार 909 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 646 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 39 लाख 33 हजार 496 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्याअंतर्गत 1 कोटी 47 लाख 82 हजार 812 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 811 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *