# पुणे विभागात एकूण कोरोनाबाधित 1,363 रुग्ण; आजपर्यंत एकूण 85 रुग्णांचा मृत्यू.

 

पुणे: विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 363 झाली असून, विभागात 213 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 हजार 66 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 46 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 1 हजार 363 बाधित रुग्ण असून 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 1 हजार 230 बाधित रुग्ण असून 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 33 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 61 बाधित रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 29 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 10 बाधित रुग्ण आहेत.

आजपर्यत विभागामध्ये एकूण 14 हजार 838 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 13 हजार 975 चा अहवाल प्राप्त झाला आहे. 806 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 12 हजार 614 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 1 हजार 363 चा अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

आजपर्यंत विभागामधील 52 लाख 79 हजार 124 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 98 लाख 80 हजार 41 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 101 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *