# पुणे विभागात 1 हजार 457 कोरोनाबाधित; 230 जण बरे झाल्याने डिस्चार्ज, एकूण 88 रुग्णांचा मृत्यू.

 

पुणे: पुणे विभागातील 230 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 457 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 139 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 48 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरिक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 1 हजार 457 बाधित रुग्ण असून 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 1 हजार 319 बाधित रुग्ण असून 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 33 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 65 बाधित रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 29 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 11 बाधित रुग्ण आहेत.

आजपर्यत विभागामध्ये एकूण 15 हजार 811 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 14 हजार 935 चा अहवाल प्राप्त झाला आहे. 877 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 13 हजार 428 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 1 हजार 457 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 54 लाख 35 हजार 546 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 6 लाख 3 हजार 94 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 131 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *