पुणे : आज शनिवारी विभागात 17 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 300 झाली आहे, विभागातील 61 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, 1 जणाचा मृत्यू झाला असून तो कराड (जि. सातारा) येथील आहे. आज केआयआयएमएस हॉस्पिटल, कराड येथे 62 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णास मधुमेह विकार होता.
अ. क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 पुणे / पिंपरी चिंचवड मनपा 251 26
2 पुणे ग्रामीण 12 1
3 कोल्हापूर 5 0
4 सातारा 6 2
5 सांगली 26 0
एकूण 300 29
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 4625 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4311 चा अहवाल प्राप्त आहे. 311 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 4011 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 300 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 25,06,156 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1,02,59,007 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 772 व्यक्तीना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.