# पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी खासगी डॉक्टरांची सेवा घेणार.

 

पुणे : पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता कक्षामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासू नये, यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी  पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोवीड – 19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी  डॉक्टरांची सेवा अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्याकडे  अधिग्रहित केल्या आहेत. तथापि अधिष्ठाता, आवश्यकतेनुसार अधिग्रहित केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांची सेवा उपलब्ध करुन घेतली जाणार आहे. नियुक्ती केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांचे योग्य ते मानधन अदा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाबाधित रूग्ण ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती होत आहेत. या रुग्णांना उत्कृष्ट उपचार होण्याच्या दृष्टीने व रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता कक्षामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासू नये यासाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांनी बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख व प्राध्यापक डॉ. संयोगिता नाईक व राजेंद्र गोळे यांची समन्वयक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *