# पुण्यात कोरोनाबाधित 7 रुग्णांचा मृत्यू; विभागात आजपर्यंत एकूण 25 जणांचा मृत्यू.

पुणे : पुणे विभागात आज गुरूवारी 53 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे विभागातील ‘कोरोना’ बाधित रुग्णांची संख्या 246 झाली आहे. आज विभागात 7 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने आजपर्यंत एकूण बळीची संख्या 25 झाली आहे.
24 तासामध्ये अहवाल प्राप्त झालेल्या मृत्यूपैकी 6 पुणे महानगरपालिका क्षेत्रातील असून 1 बारामतीमधील रहिवासी असल्याचे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
सह्याद्री हॉस्पिटल, कर्वेरोड येथे पुण्यातील 42 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णास श्वसन संस्थेतील जंतू संसर्ग, अल्कोहोलीक लिवर व मधुमेहाचा विकार होता. ससून हॉस्पिटल येथे पुण्यातील 63 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णास निमोनिया व किडनीचा विकार होता.
पुण्यातीलच 60 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा ससून हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे. या रुण्गास निमोनिया व कीडनी विकार होता.
बारामतीमधील 65 वर्षीय पुरुष रुण्गाचाही मृत्यू ससून हॉस्पिटल येथे झाला आहे. या रुग्णास निमोनिया विकार होता. नोबल हॉस्पिटल येथे पुण्यातील 62 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णास निमोनिया, मधूमेह व या रुग्णाचे बहू अवयव निकामी झाली होते. जहांगीर हॉस्पिटल येथे पुण्यातील 62 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णास मधूमेह व अल्सरचा विकार होता. ससून हॉस्पिटल येथे 58 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णास निमोनिया व तीव्र श्वसन विकार होता.
पुणे विभागातील बाधित रुग्ण व मृत्यू यांची संख्या
क्र जिल्हा/मनपा बाधीत रुग्ण मृत्यू
1 पुणे (पुणे मनपा) 176 23
2 पुणे पिंपरीचिंचवड मनपा) 22 0
3 पुणे ग्रामीण 12 1
4 सोलापूर 0 0
5 कोल्हापूर 4 0
6 सातारा 6 1
7 सांगली 26 0
एकूण 246 25
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागातील पुणे महानगरपालिका क्षेत्रामधील एकूण 35 चौरस कि.मी. क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. एकूण 15 वार्डपैकी 2 वार्डमध्ये पूर्ण संचार बंदी लागू करण्यात आली असून 7 वार्डामधील प्रत्यकी 1 प्रभागामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सुमारे 10 लाख 50 हजार इतकी लोकसंख्या प्रभावित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *