# प्रतिबंधित क्षेत्र वगळून ग्रामीण भागातील कारखाने, वाहतूक रस्ते, सिंचन प्रकल्प, इमारत बांधकाम उद्योग संबंधित प्रकल्प सुरु राहणार.

 

संग्रहित छायाचित्र

मुंबई: 20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. जेणेकरून अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरत राहील. यादृष्टीने राज्य सरकारने सुधारित मार्गदर्शक आदेश जारी करण्यात केले आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळून ग्रामीण भागातील कारखाने, फळे आणि फुले यासंबंधित प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि वाहतूक सेवा सुरू राहणार. तसेच रस्ते, सिचन प्रकल्प, इमारत बांधकाम उद्योग संबंधित प्रकल्प सुरु राहणार आहेत.

20 एप्रिल नंतर लॉकडाऊनचे मूळ उद्दिष्ट्य समोर ठेवून कंटेंनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात सुधारित आदेशानुसार कामकाज सुरु होईल. केंद्राने निर्देश दिल्याप्रमाणे लॉकडाऊन 3 मे पर्यंत आहे. त्याचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळणे, नियमित मास्क घालणे या व अशा कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तसंच धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी दिली जाणार नाही. मात्र, लोकांना अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विना अडथळा मिळत राहतील. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी

*ग्रामपंचायत स्तरावरील सरकारमान्य सेवा सुविधा केंद्र (common service center) सुरू राहणार*

■ अतिरिक्त औद्योगिक घटकांसह, शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट
■ १० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य
■ मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी ‘एस.टी.’ आणि ‘बेस्ट’ ची विशेष बस सुविधा

मनरेगा

मनरेगा काम social distancing पाळून सुरू होणार
सिंचन आणि पाणी वाचवण्याच्या संबंधाबाबत कामे मनरेगामध्ये प्राधान्याने सुरू होणार

खासगी क्षेत्र

– इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि DTH केबल सर्व्हिस
– IT आणि त्यासंबंधित सेवा सुरू राहतील पण 50% कर्मचारी काम करणार
– डेटा आणि कॉल सेंटर कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू राहणार
– ग्रामपंचायत स्तरावरील सरकारमान्य सेवा सुविधा केंद्र (common service center) सुरू राहणार
– इ कॉमर्स कंपनी
– कुरियर सर्व्हिस

इंडस्ट्री

– घाऊक आणि वितरण सेवा (wholesale and distribution)
– प्रतिबंध क्षेत्र वगळून Sez, industrial estate आणि industrial township मध्ये उत्पादन करणारे कारखाने सुरू होणार
– कारखान्याच्या परिसरात कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करावी
– कामाच्या ठिकाणी कर्मचारी येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करावी, त्यात social distancing पाळावे
– प्रतिबंधात्मक क्षेत्रातून कोणतीही व्यक्ती अशा ठिकाणी कामावर येऊ शकणार नाही
– प्रतिबंधित क्षेत्र वगळून ग्रामीण भागातील कारखाने
– फळे आणि फुले यासंबंधित प्रोसेसिंग,पॅकेजिंग आणि वाहतूक सेवा सुरू राहणार
– बांधकाम संबंधित काम

(प्रतिबंधित क्षेत्र वगळून)
– रस्ते, सिचन प्रकल्प, इमारत बांधकाम उद्योग संबंधित प्रकल्प
– मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात बांधकाम कामांसाठी बाहेरून कामगार आणावे लागणार नाहीत अशा कामाबाबत आयुक्तांनी निर्णय घ्यावा

शेती – मान्सून पूर्व अत्यावश्यक कामे सुरू होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *