प्रतिकात्मक छायाचित्र
नवी दिल्ली: प्रसार माध्यमात काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामामुळे कोरोनाची लागण झाल्याच्या देशाच्या विविध भागातून झालेल्या घटनाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी आज बुधवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
देशाच्या विविध भागात कोरोना संदर्भात घटनांचे वार्तांकन करण्यासाठी, प्रतिबंधित क्षेत्र, हॉटस्पॉट तसेच कोरोनाग्रस्त व इतर भागात जाणाऱ्या किंवा इतर भागात प्रवास करणाऱ्या वार्ताहर, कॅमेरामन, फोटोग्राफर यांच्यासह माध्यमकर्मीनी आपले कर्तव्य बजावताना आरोग्याची आणि संबंधित इतर खबरदारी घ्यावी. माध्यम समूहांनी कार्यालयीन आणि प्रत्यक्ष घटनास्थळी जाणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांची आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर या लिंकवर संपूर्ण मार्गदर्शक सूचना वाचता येतील
https://mib.gov.in