# राज्यातील काही भागात 20 एप्रिलनंतर उद्योग, व्यवसाय सुरू; राज्य शासनाचा सुधारित आदेश.

 

 

मुंबई: राज्यातील काही भागात 20 एप्रिलनंतर पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रमांना सुरू करण्यात येत आहे जेणे करून अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरत राहील. यादृष्टीने राज्य शासनाने सुधारित मार्गदर्शक आदेश जारी केले आहेत.

अर्थातच कोरोनाचा मुकाबला करणे हे लॉकडाऊनचे मूळ उद्दिष्ट्य अबाधित राहून कंटेंनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील

केंद्राने निर्देश दिल्याप्रमाणे लॉकडाऊन 3 मे पर्यंत आहे. त्याचे अतिशय काटेकोर पालन करायचे आहे . सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळणे, नियमित मास्क घालणे या व अशा कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत.

कुठल्याही कारणांसाठी गर्दी झालेली चालणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही. लोकांना अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विना अडथळा मिळत राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाने नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली आहे, त्यातील काही ठळक बाबी:

अतिरिक्त औद्योगिक घटकांसह, शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट

१० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य

मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी ‘एस.टी.’ आणि ‘बेस्ट’ ची विशेष बस सुविधा

➡ *सर्वसमावेशक अधिसूचना वाचण्यासाठी क्लिक करा-*
https://bit.ly/3cqhX4n

One thought on “# राज्यातील काही भागात 20 एप्रिलनंतर उद्योग, व्यवसाय सुरू; राज्य शासनाचा सुधारित आदेश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *