बँक अथवा वितीय संस्थानी अाकारलेल्या ईएमआयसंबंधी अनेक गैरसमज पसरविले जात अाहेत. परंतु त्याचा नीट अर्थ समजून घेणे अावश्यक अाहे. EMI= म्हणजे Equated Monthly Installment (मासिक पाडलेले हप्ते) असा त्याचा ढोबळ अर्थ अाहे.
कोणत्याही ग्राहकांनी कर्ज घेतल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी ठराविक हप्त्यामध्ये मुद्दल +व्याज दोन्ही मिळून हप्ता भरावा लागतो त्याला EMIअसे म्हणतात.
हजारो ग्राहक सक्षम असूनही नियमित दरमहा कर्जाची परतफेड करीत नाहीत. परंतु रक्कम अाली की अापण परतफेड करतो तेंव्हा व्याजाची टक्केवारी, दंड अाकारली तरी ती अापण देण्याची तयारी ठेवून कर्जातून मूक्ततता मिळवून घेतो.
1) सध्याच्या कोरोनाच्या अार्थीक मंदीमौळे दरमहा EMIभरला नाही तर तीन महिन्यापर्यंत कांही बिघडत नाही ( ही ढील कोणालाही मिळू शकते)
2)परंतु रक्कम अापलेकडे असेल तर हप्ते भरणे केंव्हाही शहानपणाचे असते व भविष्यातील व्याजाचा, दंडात्मक भुर्दंड वाचतो.
3)कर्ज वितरण प्रणाली व नियमानुसार कोणत्याही कर्जदाराकडून थकीत महिण्याचा हप्ता + व्याज+दंड वसूल केले जाते व ते संयूक्तीक अाहे. अन्यथा देशातील एकही बॅंका /वितीय संस्था कर्ज बुडव्या प्रवृर्तीमुळे चालणार नाही.
4)RBI व्याज दराबाबत धोरणात्मक निर्णय घेत अासते त्यानुसारच व्याज दर अाकरले जाते. परंतौ हप्ते कीती पाडायचे (period), कसे पाडायचे व व्याज दर अाकारणी (rate of interest) हे ग्राहकाच्या सोयीनुसारच व RBI च्या धोरणानुसार अाकारणी केली जाते. EMIबाबतची तीन महिन्याची सवलत सरकार व RBI कडून देणे ही टेंम्पररी ढील अाहे. अाजच्या कोरोनाच्या अार्थीक मंदीच्या काळात EMI लेट केल्यास दंडाची रक्कम माफ होऊ शकते. परंतु थकीत कर्जाच्या हप्त्याची रक्कम उशीरा का होईना ती भरणे क्रमप्राप्त अाहे.
– प्रा. डाॅ.एस.एस. जाधव
(लेखक वाणिज्य विषयाचे तज्ज्ञ प्रा. आहेत)
मो.7588152465. mail: shriramjadhav2012@gmail.com