# औरंगाबादेत 60 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; एकूण बळी 6.

 

औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 25 रोजी दाखल करण्यात आलेल्या 60 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा आज सोमवारी दुपारी 12.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे औरंगाबादेतील मृतांची संख्या ६ झाली आहे.

या महिलेस लेफ्ट साईडेड न्यूमोनायटिस विथ डायबेटिस विथ हायपरटेंशन विथ हायपोथायरॉडीझम या आजारामुळे घाटीत 25 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. 25 एप्रिल रोजीच त्यांचा स्वॅब घेण्यात आला व त्याच दिवशी त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. घाटीतील उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांचे मृत्यूचे कारण बायलॅटरल न्युमोनाटीस विथ ऍ़क्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम ड्यू टू कोविड 19 इन केस ऑफ डायबेटिस मलायटस टाइप टू विथ डायबेटिक नेफ्रोपॅथी, हायपरटेंशन, इस्चेमिक हार्ट डिसीज विथ हायपोथयरॉडिझम असल्याचे सांगण्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *