# कोरोनाबाधित ३६५रुग्ण बरे होऊन घरी; राज्यातील रुग्ण संख्या ३६४८, राज्यात ११ करोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू -राजेश टोपे.

 

मुंबई: आज राज्यात कोरोनाबाधित ३२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. आज दिवसभरात ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३०७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज शनिवारी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ हजार ४६८ नमुन्यांपैकी ६३ हजार ४७६ जणांचे कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ३६४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८२ हजार २९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ११ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २११ झाली आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील ५ आणि पुणे येथील ४ तर १ मृत्यू औरंगाबाद मनपा आणि १ मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. त्यात ६ पुरुष तर ५ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर ६ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये ( ८२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: २२६८ (१२६)
ठाणे: १८ (२)
ठाणे मनपा: ११६ (२)
नवी मुंबई मनपा: ६५ (३)
कल्याण डोंबवली मनपा: ७३ (२)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ४
मीरा भाईंदर मनपा: ६४ (२)
पालघर: २१ (१)
वसई विरार मनपा: ६२ (३)
रायगड: १३
पनवेल मनपा: २९ (१)
*ठाणे मंडळ एकूण: २७३४ (१४२)*
नाशिक: ३
नाशिक मनपा: ५
मालेगाव मनपा: ४५ (२)
अहमदनगर: १९ (१)
अहमदनगर मनपा: ९
धुळे: १ (१)
धुळे मनपा: ०
जळगाव: ०
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ०
*नाशिक मंडळ एकूण: ८५ (५)*
पुणे: ११ (१)
पुणे मनपा: ५२८ (४९)
पिंपरी चिंचवड मनपा: ४५ (१)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: १४ (१)
सातारा: ११ (२)
*पुणे मंडळ एकूण: ६१६ (५४)*
कोल्हापूर: २
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:०
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ६ (१)
*कोल्हापूर मंडळ एकूण: ३८ (१)*
औरंगाबाद:०
औरंगाबाद मनपा: २९ (३)
जालना: २
हिंगोली: १
परभणी: ०
परभणी मनपा: १
*औरंगाबाद मंडळ एकूण: ३३ (३)*
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०
*लातूर मंडळ एकूण: १२*
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ८
अमरावती: ०
अमरावती मनपा: ६ (१)
यवतमाळ: १३
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
*अकोला मंडळ एकूण: ५६ (३)*
नागपूर: २
नागपूर मनपा: ५८ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: ६३ (१)*
*इतर राज्ये: ११ (२)*
*एकूण: ३६४८ (२११)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *