# जालन्यातील शहागड गाव सील; 26 जण कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आल्याने जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल.

अंबड : दिल्ली येथील तबलीगी जमातचे 12 जण त्यापैकी 8 कोरोना पॉझिटिव्ह हे चारचाकी वाहनाने दिल्ली येथून त्यांच्या गावी हैदराबाद येथे जात असतांना ते अंबड तालुक्यातील शहागड येथील 26 जणांच्या संपर्कात आल्याने त्यांना काल शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हे 8 जण शहागड येथे थांबले होते त्यामुळे प्रशासनाने अख्खे गावच्या सील केले आहे.
शहागड येथे 30 मार्चला तबलीगी जमातचे 12 जण हे चारचाकीने दिल्ली येथून राष्ट्रीय महामार्ग 52 वरील पाचोड (जि.औरंगाबाद) येथे थाबंवले व मध्यरात्री शहागडला आले असता बीडकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या बीड-जालना चेक पोस्टवर त्यांच्या दोन्ही गाड्या पोलिसांनी थांबवून विचारपूस करुन आल्या मार्गाने रात्री 11 वाजता परत पाठवल्या. यावेळी या वाहनाच्या चालकांने हरियाणा डीवायएसपी पास दाखवला परंतु तो या ठिकाणी नाकरण्यात आला व दोन्ही वाहने वापस येऊन पाचोड येथे मुक्काम करुन पाचोड येथे पहाटे नमाज पाठण करुन सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान, शहागड येथे परतले याठिकाणी या वाहनातील लोकांचा संपर्क शहागडच्या एका कुटुंबाकडे चहा घेतला व त्यानंतर त्यांचा शहागड येथील पंक्चर दुकानदार यांच्याशी संपर्क आला. तेथून एका हॉटेलच्या मालकाने त्यांचे दोन्ही वाहने गेवराईकडील कच्च्या रस्त्याने चेकपोस्ट चुकवून रवाना करुन दिली. पुढे ही वाहने निलंगा (जि.लातूर) येथे चेकपोस्टवर थांबवून विचारपूस करुन या 12 लोकांची कोरोनाविषयी चाचणी करण्यात आली. यामध्ये 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण-कोण आले होते, हे कुठे थाबंले आदी बाबीची माहिती निलंगा पोलिसांनी जालना जिल्ह्यातील पोलिसांना दिली तेव्हा शहागड येथे कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांचा शहागड येथील लोकांशी संपर्क आल्याची माहिती मिळताच यंत्रणा सतर्क झाली. सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, उपनिरीक्षक हनुमंत वारे, जमादार बी.आर. आहेर यांनी शहागड सील करत कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांच्या संपर्कातील लोकांना जालना येथे तत्काळ हालवले व शहागड गाव संपूर्ण लॉकडाऊन करून सील करण्यात आले असून, गावात कुणीही आत व बाहेर जाऊ शकत नाही तसेच या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली 50 पोलिसानी गावात जागो जागी नाकाबंदी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *