# दहावीचा भूगोलाचा पेपर, नववी, अकरावीची परीक्षाही रद्द – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.

 

मुंबईः दहावी (एसएससी) परीक्षेच्या भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय आज रविवारी राज्य सरकारने घेतला. त्याचबरोबर नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्यामध्ये लॉकडाऊनची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोलाच्या पेपरचे सरासरी गुण दिले जाणार आहेत. इयत्ता नववी आणि अकरावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रातील चाचण्या, प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापन करून त्यानुसार पुढच्या वर्गात बढती देण्यात येणार आहे. इयत्ता दहावीच्या शिल्लक राहिलेल्या भूगोलाच्या परीक्षेबाबत मूल्यमापनासंदर्भात कारवाईच्या सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देण्यात आल्या असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *