नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत 472 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असून आतापर्यंत 79 जणांचा बळी गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सायंकाळी 4 वाजता दिली. देशभरात कोरोनाबाधीतांचा आकडा 3374वर पोहोचला असून मकरज/तबलिकीमुळे कोरोनाबाधीतांची संख्या वाढली, अशी माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली. अत्यावश्यक सेवांचा पुरवठा लॉकडाउनदरम्यान सुरूच आहे, असेही सांगण्यात आले. कोरोना या संसर्गजन्य आजारावर अद्याप कुठलीही लस निघाली नसून सोशल डिस्टसिंग कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात मोठी लस असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. धुम्रपान, तंबाखुचे सेवन करू नका. सार्वजनिक ठिकाणी थुकल्यास कोरोनासा संसर्ग होण्याचा धोका असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले. लॉकडाउनदरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय होवू नये म्हणून अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरू आहे. तसेच या दरम्यान कामगार/मजुरांची गैरसोय टाळण्यासाठी देशभरात 28 हजार ठिकाणी तात्पूरता निवारा उभारण्यात आला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. देशभरातील 274 जिल्ह्यांत कोरोनाचा प्रसार झाला असून सर्वांनी सोशल डिस्टसिंग पाळावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.