पुणे : आज शुक्रवारी विभागात 15 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 261 झाली आहे. विभागात कालच्या अहवालानंतर 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अहवाल प्राप्त झालेल्या मृत्यूंपैकी सर्व 3 जण पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. काल ससून हॉस्पिटल येथे पुण्यातील 65 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णास उच्च रक्तदाब व मधुमेह होता. ससून हॉस्पिटल येथे पुण्यातील 65 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णास निमोनिआ, मधुमेह विकार होता. ससून हॉस्पिटल येथे पुण्यातील 44 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णास निमोनिआ होता.
आजपर्यत विभागामध्ये एकूण 4137 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 3755 चा अहवाल प्राप्त आहे. 382 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3494 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 261 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 23,63,202 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 97,06,804 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 772 व्यक्तीना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
आज विभागीय आयुक्त यांनी विभागातील पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, सीव्हील सर्जन व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत व्हीडीओ कॉन्फरन्सगींद्वारे सविस्तर चर्चा केली यामध्ये कोरोना वैद्यकीय सुविधा, खाजगी हॉस्पिटलचा सहभाग, उपलब्ध क्वारंटाईन / आयासोलेशन सुविधा, मृतदेह दहन / दफन, जीवनावश्यक वस्तू / वैद्यकीय उपकरणे/ औषध उत्पादन उद्योग सुरु असणेबाबत खात्री, आरोग्य कर्मचारी / आशा वर्कर प्रशिक्षण, सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी उपलब्धता, बेघरांसाठीच्या सुविधा, सहकारी साखर कारखान्यांच्या मजुरांची व्यवस्था, अन्नधान्य / दूध / भाजीपाला पुरवठा स्थिती, शिधापत्रिका नसलेल्यांसाठीची व्यवस्था, Community Kitchen व तयार अन्न वाटप व्यवस्था, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग व त्यांचे प्रश्न, मरकज / तबलीगींची शोध मोहीम इत्यादी विषयांचा आढावा घेऊन महत्वपूर्ण सूचना केल्या.