# पुणे विभागात 24 हजार 782 क्विंटल अन्नधान्याची तर 10 हजार 979 क्विंटल भाजीपाल्याची आवक.

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 24 हजार 782 क्विंटल अन्नधान्याची तर 10 हजार 979 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 12 हजार 436 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 12 हजार क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज सोमवारी दिली आहे.
पुणे विभागात 5 एप्रिल रोजी 99.687 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून, 22.90 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे विभागात 65 हजार 200 स्थलांतरित मजुरांची सोय ; 1 लाख 19 हजार मजुरांना भोजन
सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 116 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 574 कॅम्प असे पुणे विभागात एकूण 690 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 65 हजार 200 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 19 हजार 480 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *