# पुण्याच्या रुबी हॉलमधील नर्स कोरोना पॉझिटिव्ह; 25 नर्स क्वारंटाईन.

संग्रहित छायाचित्र.

पुणे : नामांकित रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये नर्सिंग विभागाच्या इंचार्ज नर्स कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज रविवारी उघड झाले. त्यामुळे त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या आणखी सुमारे 25 नर्सला क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नर्सला दोन दिवसापूर्वी ताप आला होता. त्यांची तपासणी केली असता कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या नर्सचे वय 50 असून त्यांच्यावर रुबीमध्येच उपचार करण्यात येत आहेत.

रुबी हॉल क्लिनिकच्या मुख्य इमारतीमध्ये एच नावाचा वॉर्ड असून तेथे या नर्स इंचार्ज म्हणून कार्यरत आहेत. तसेच येथे आणखी अन्य उपचारासाठी रुग्णदेखील अॅडमिट असून त्यांनाही बाधा झाली असण्याची शक्यता असल्याने त्यांचेदेखील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. दरम्यान, नर्सला कोरोनाची बाधा झाल्याने तेथील डॉक्टरही धास्तावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *