# पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमधील १९ नर्ससह २५ जणांना कोरोनाची लागण.

 

संग्रहित छायाचित्र

पुणे: पुणे शहर व परिसरात कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. येथील प्रख्यात रूबी हॉल क्लिनिकमधील १९ नर्स व ६ कर्मचारी असे मिळून २६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या सर्व २५ जणांचे विलगीकरण करण्यात आले असून, त्यांच्यावर आयसोलेशन वार्डमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

मागील एक महिन्यापासून रूबी हाल क्लिनिकमध्ये येणारे पेशंट,  त्यांचे नातेवाईक  यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती रूबी हाल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोटे यांनी दिली.  याबरोबरच रूग्णालयातील नर्स व कर्मचारी मिळून सुमारे एक हजार जणांची तपासणी केली. यामध्ये १९ नर्स व ६ अन्य कर्मचारी असे मिळून एकूण २५ जणांमध्ये कोरोना पाझिटिव्ह ही लक्षणे आढळून आली आहेत. त्यानंतर त्यांचे तत्काळ विलगीकरण करून त्यांच्यावर आयसोलेशन वार्डमध्ये उपचार करण्यात येत आहेत. तसेच पाझिटिव्ह आढळलेल्या या २५ जणांच्या संपर्कात जे कोणी आले होते, त्यांचेही स्क्रिनिंग करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *