# पुण्यात कोरोनाबाधित 2 महिलांचा मृत्यू; सोलापूर येथे कोरोनाचा पहिला बळी.

 

पुणे : शहरातील दोन कोरोनाबाधित महिलांचा आज रविवारी ससून रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, सोलापूर शहरातही काल शनिवारी एका रूग्णाचा मृत्यू झाला असून, आज त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तो सोलापूर येथील पहिला बळी ठरला आहे.

संगमवाडी परिसरातील ५८ वर्षीय महिलेला 9 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तसेच सोमवार पेठेतील ५६ वर्षीय महिलेला 5 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तिलाही मधुमेह आणि उच्च रक्तदाब याचा त्रास होता. तसेच तिचे विविध अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाला.

सोलापूरात पहिला बळी
सोलापूरमधील पाच्छा पेठ परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाल्याच्या वृत्तास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दुजोरा दिला आहे. हा रुग्ण दहा तारखेला दाखल झाला होता. काल शनिवारी पहाटे तो मरण पावला. आज रविवारी त्याचा कोरोना पॉझिटिव्ह असा अहवाल आला आहे. रुग्णाचे वय 56 आहे पोलिसांनी हा सर्व परिसर आता सील करणं सुरू केल असून, आजूबाजूच्या लोकांची तसेच या रुग्णाच्या कुटुंबियांची माहिती घेणं सुरू झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *