पुणे : मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात कोरोनामुळे चोवीस तासात आणखी दोन बळी गेले आहेत. कोरोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ससूनमध्येच एका ४८ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, रुग्णालय प्रशासनानं ही माहिती दिली.
ससून रुग्णालयात दाखल असलेल्या या दोन्हीही रुग्णांची कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यांपैकी ६० वर्षीय महिलेवर यापूर्वी नायडू रुग्णालयात उपचार सुरु होते. यावेळी तिची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आल्याने तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा प्रकृती बिघडल्याने तिला काल शनिवारी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. तसेच मृत्यूपूर्वी या महिलेच्या घशातील द्रवाचे (स्वॅब) नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
तसेच एका ४८ वर्षीय पुरुषाचा देखील ससूनमध्ये मृत्यू झाला असून त्याच्या स्वॅब चाचणीचा अहवाल काल शनिवारी रात्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. या अहवालात संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आह