पुणे : पुण्यात आज बुधवारी कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आजपर्यंत एकूण बळीची संख्या 18 झाली आहे. ससून रूग्णालयात आज दिवसभरात 5 तर, आजपर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
दीनानाथ मंगेशकर व औध येथील जिल्हा रुग्णालयात प्रत्येकी 1, नायडू रूग्णालयात 2, नोबेलमध्ये 2 व इनामदार रूग्णालयातही आज 1 व यापूर्वीचा एक असे 2, सह्याद्रीतही आजचा 1 व यापूर्वीचा 1 असे 2 मिळून आजपर्यंत एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेली एकूण रुग्णसंख्या194 आहे. आतापर्यंत 33 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आले आहे. पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत उपाययोजना करण्यात येत असून महानगरपालिका क्षेत्रातील काही भागात संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचे 25 दवाखाने सकाळी 8.00 वाजेपासून रात्री 8.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.
पुणे विभागातील कोरोना सांसर्गिक एकूण रुग्ण संख्या 229 झाली असून ती जिल्हानिहाय पुणे 194, सातारा 6, सांगली 26 आणि कोल्हापूर 3 याप्रमाणे आहे. आतापर्यंत 33 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. तसेच 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत विभागामधील 21,11,242 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 87,10,795 व्यक्तींची तपासणी केली आहे.