प्रतिकात्मक छायाचित्र
पुणे: हातभट्टी दारुची विक्री करीत असताना एका यु ट्युब चॅनेलचा पत्रकार असल्याचा दावा करणार्यास व त्याच्या वकील पत्नीसह चार जणांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या घरातील 12 हजार 700 रुपयांची 145 लिटर गावठी दारु व इतर साहित्य जप्त केले आहे़. राहुल मच्छिंद्र हरपळे (33), अॅड. सुचिता राहुल हरपळे (30), नंदा मच्छिंद्र हरपळे (55) आणि मच्छिंद्र गुलाब हरपळे (61, सर्व रा चंदवाडी, फुरसुंगी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़
फुरसुंगी येथील चंदवाडीमध्ये घरात गावठी दारुची विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हरपळे याच्या घरावर गुरुवारी दुपारी 12 वाजता छापा टाकला. यावेळी राहुल याने मी पत्रकार आहे. तसेच त्याची पत्नी सुचिता हिने मी वकील आहे़ तुमचेबद्दल वरिष्ठांना तक्रार करुन कारवाई करायला लावतो, अशी धमकी दिली. दरम्यान, त्यांच्या घरातून कॅनमध्ये 105 लिटर व प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये 40 लिटर दारु तसेच अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे़.