# मराठवाड्यात एकूण 73 कोरोनाबाधित; 34 रुग्णांना डिस्चार्ज : 5 जणांचा मृत्यू.

 

औरंगाबाद: औरंगाबाद विभागांतर्गत आठ जिल्ह्यांमध्ये एकूण 73 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्‍यापैकी औरंगाबाद येथे 49 रुग्‍ण (5‍ रुग्‍णाचा मृत्‍यू झालेला आहे व 22 रुग्‍ण बरे झाल्‍यामुळे डिस्‍चार्ज देण्‍यात आले आहे.

जालना-२, परभणी-१, हिंगोली-8 (एक रुग्‍ण हा बरा झाल्‍यामुळे त्‍यास डिस्‍चार्ज देण्‍यात आला आहे), नांदेड-१, लातूर-9 (8 रुग्‍णे बरे झाल्‍यामुळे त्‍यांना डिस्‍चार्ज देण्‍यात आले आहे) आणि उस्‍मानाबाद-३ (सर्व रुग्‍ण बरे झाल्‍यामुळे त्‍यांना डिस्‍चार्ज देण्‍यात आले आहे) रुग्‍णांचे निदान झाले आहे. आज शनिवारी औरंगाबाद विभागांतर्गत वस्‍तुतः 34 कोरोनाबाधित रुग्‍णांवर उपचार चालू आहेत. (औरंगाबाद-22, जालना-2 व परभणी-1, हिंगोली-7 , नांदेड-1, लातूर-1).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *