# मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी; 59 वर्षीय कोरोनाबाधीताचा उपचारादरम्यान मृत्यू.

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेतून अत्यंत धक्कादाय बातमी हाती आली आहे. जलाल कॉलनी येथील 59 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना रविवार, 5 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. काल सायंकाळीच त्यांचा कोरोना संदर्भातील अहवाल पॉझिटीव्ह आला होता. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबईवरून ते प्रवास करून आले होते. अनेक आजारांनीही त्यांना ग्रासलेले होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. आता औरंगाबादेत कोरोना बाधीतांची एकूण संख्या 7 आहे. विषेश म्हणजे आजच, रविवारी एकाच दिवशी 5 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची वार्ता आल्यानंतर औरंगाबादेत खळबळ उडाली आहे. त्यातच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सोशल डिस्टंस सर्वांनी पाळावे, असे आवाहान राज्यसरकारसह जिल्हा प्रशासन करत आहे. मीच माझा रक्षक हाच यावर उपचार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *