मुंबई : वैयक्तिक किंवा कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क नसल्यास संबंधिताला अटक होणार आहे.
यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज बुधवारी तसे आदेश जारी केले आहेत. मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून महापालिकेने कडक पावले उचलण्यात सुरूवात केली आहे.
कोरोनाविरोधात लढण्याची संधी
दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाविरोधात विविध पातळीवर विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने प्रशिक्षण घेतलेले किंवा आर्मी रिटायर झालेले किंवा नर्स, वार्डबाॅय आशा व्यक्तींना काम करण्याची इच्छा असेल तर त्यांनी खालील मेल आयडीवर माहिती पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. Covidyoddha@gmail.com