मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात ‘लॉकडाऊन’ असल्याने महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील 73 लाख 29 हजार वीजग्राहकांनी घरबसल्या गेल्या महिन्यात 1227 कोटी 25 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे. यामध्ये सर्वाधिक पुणे परिमंडलातील 13 लाख 50 हजार तसेच भांडूप परिमंडलातील 11 लाख वीजग्राहकांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यामध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. तसेच येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र देखील बंद आहेत. मात्र, वीजग्राहकांनी महावितरणची www.mahadiscom.in
मार्च महिन्यात 73 लाख 29 हजार ग्राहकांनी घरबसल्या 1227 कोटी 25 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला.
‘लॉकडाऊन’मुळे महावितरणकडून 23 मार्चपासून वीजबिलांची कागदी छपाई व वितरण बंद करण्यात आले आहे. मात्र, मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठविण्यात येत आहे. याशिवाय वेबसाईट व मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत. क्रेडीट कार्ड वगळता महा
नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबि
महावितरणने वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल अॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध आहे. या ॲपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत. प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना स्वतःच्या अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करणे शक्य झाले आहे. त्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डे