# राज्यात ११८ नवीन रुग्ण; एकूण रुग्ण ३३२०, कोरोनाबाधित ३३१ रुग्ण बरे होऊन घरी -राजेश टोपे.

 

मुंबई: आज शुक्रवारी राज्यात कोरोनाबाधित ११८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३३२० झाली आहे. आज दिवसभरात ३१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३३१ रुग्ण बरे झाले आहेत. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६१ हजार ७४० नमुन्यांपैकी ५६ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर ३३२० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७४ हजार ५८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ५, तर पुण्यातील २ जण आहेत. त्यापैकी ५ पुरुष तर २ महिला आहेत. आज झालेल्या ७ मृत्यूपैकी ६ जण हे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ७ जणांपैकी ५ रुग्णांमध्ये ( ७१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २०१ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: २०८५ (१२२)
ठाणे: २९ (२)
ठाणे मनपा: ९६ (१)
नवी मुंबई मनपा: ६३ (३)
कल्याण डोंबवली मनपा: ६८ (२)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: १
मीरा भाईंदर मनपा: ५३ (२)
पालघर: १४ (१)
वसई विरार मनपा: ६१ (३)
रायगड: ८
पनवेल मनपा: २८ (१)
*ठाणे मंडळ एकूण: २५०७ (१३७)*
नाशिक: ३
नाशिक मनपा: ५
मालेगाव मनपा: ४५ (२)
अहमदनगर: १९ (१)
अहमदनगर मनपा: ९
धुळे: १ (१)
धुळे मनपा: ०
जळगाव: ०
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ०
*नाशिक मंडळ एकूण: ८४ (५)*
पुणे: १७
पुणे मनपा: ४५० (४६)
पिंपरी चिंचवड मनपा: ३७ (१)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: १२ (१)
सातारा: ७ (२)
*पुणे मंडळ एकूण: ५२३ (५०)*
कोल्हापूर: २
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:०
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ६ (१)
*कोल्हापूर मंडळ एकूण: ३८ (१)*
औरंगाबाद:०
औरंगाबाद मनपा: २८ (२)
जालना: २
हिंगोली: १
परभणी: ०
परभणी मनपा: १
*औरंगाबाद मंडळ एकूण: ३२ (२)*
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०
*लातूर मंडळ एकूण: १२*
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ७
अमरावती: ०
अमरावती मनपा: ५ (१)
यवतमाळ: १३
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
*अकोला मंडळ एकूण: ५४ (३)*
नागपूर: २
नागपूर मनपा: ५५ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: ६० (१)*
*इतर राज्ये: ११ (२)*
*एकूण: ३३२० (२०१)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *