# ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांची मुंबईला बदली.

 

पुणे: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची राज्य शासनाने मुंबई येथे बदली केली आहे. विशेष म्हणजे डाॅ. चंदनवाले यांच्याकडे आधीपासूनच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन खात्याचा अतिरिक्त संचालकपदाचा अतिरिक्त पदभार होता. त्यातच शासनाने त्यांची मुंबईला बदली करून त्यांना तातडीने मुंबई येथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई व पुणे ही दोन शहरे कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने उघडकीस येत असल्यामुळे रेड झोनमध्ये आले आहेत. कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे.  त्यासाठी तज्ज्ञ समितीही स्थापन केली आहे. त्यातच डॉ. चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीमुळे विविध चर्चांना उधान आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *