# पुणे विभागात 10,247 कोरोनाबाधित; आजपर्यंत एकूण 477 रुग्णांचा मृत्यू.

पुणे: पुणे विभागातील 5 हजार 635 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 247 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 135 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 477 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 223 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 7 हजार 947 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 4 हजार 729 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 861 आहे. कोरोनाबाधित एकूण 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 205 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 286 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 174, सातारा जिल्ह्यात 53, सोलापूर जिल्ह्यात 43, कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 573 कोरोनाबाधित रुग्ण असून 200 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 351 आहे. कोरोनाबाधित एकूण 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 992 कोरोनाबाधित रुग्ण असून 446 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 458 आहे. कोरोनाबाधित एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 112 रुग्ण असून 65 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 43 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 623 कोरोना बाधित रुग्ण असून 195 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 422 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *