# मुंबईतील ३२ जणांसह राज्यात आज १०५ रुग्णांचा मृत्यू; एकूण ५६९४८ कोरोना पॉझिटिव्ह.

 

मुंबई: राज्यात आज कोरोनाच्या २१९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५६ हजार ९४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख०३ हजार ९७६ नमुन्यांपैकी ५६ हजार ९४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८२ हजार ७०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३७ हजार ७६१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात १०५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८९७ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ३२, ठाण्यात १६, जळगावमध्ये १०, पुण्यात ९, नवी मुंबईमध्ये ७, रायगडमध्ये ७, अकोल्यात ६, औरंगाबादमध्ये ४, नाशिक ३, सोलापूरमध्ये ३, सातारा -२, अहमदनगर १, नागपूर १, नंदूरबार १, पनवेल १तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. या शिवाय गुजरात राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २१ एप्रिल ते २४ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६६ मृत्यूंपैकी मुंबईचे २१, ठाण्याचे १५, जळगावचे १०, नवी मुंबईचे ७, रायगडचे ७, अकोल्याचे २, साता-याचे २, अहमदनगरचा १, नंदूरबारचा १ मृत्यू आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७२ पुरुष तर ३३ महिला आहेत.

आज नोंद झालेल्या १०५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५० रुग्ण आहेत तर ४५ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १० जण ४० वर्षांखालील आहे. या १०५ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये (६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *