# पुणे विभागातील 5,900 रुग्ण बरे होऊन घरी; विभागात एकूण कोरोनाबाधित 10,704.

 

पुणे: पुणे विभागातील 5 हजार 900 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 704 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 305 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 499 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 233 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 8 हजार 303 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 4 हजार 921 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 10 आहे. कोरोनाबाधित एकूण 372 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 194 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 287 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 169, सातारा जिल्ह्यात 13, सोलापूर जिल्ह्यात 88, सांगली जिल्ह्यात 10 कोल्हापूर जिल्ह्यात 7 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 569 कोरोनाबाधित रुग्ण असून 223 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 322 आहे. कोरोनाबाधित एकूण 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 1080 कोरोना बाधीत रुग्ण असून 463 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 524 आहे. कोरोनाबाधित एकूण 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 122 रुग्ण असून 68 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 50 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 630 कोरोनाबाधित रुग्ण असून 225 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 399 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *