पुणे: पुणे विभागातील 7 हजार 896 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 662 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 171 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 595 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 248 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.36 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 9 हजार 851 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 6 हजार 235 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 184 आहे. कोरोनाबाधित एकूण 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 238 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 63.29 टक्के आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 244 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 200, सातारा जिल्ह्यात 18, सोलापूर जिल्ह्यात 8, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 7 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील 649 कोरोनाबाधित रुग्ण असून 368 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 253 आहे. कोरोनाबाधित एकूण 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 1303 कोरोनाबाधित रुग्ण असून 725 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 457 आहे. कोरोनाबाधित एकूण 121 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 172 कोरोनाबाधित रुग्ण असून 96 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 70 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 687 कोरोनाबाधित रुग्ण असून 472 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 207 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.