औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज 37 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1285 झाली आहे. आतापर्यंत 619 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याने ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 616 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, 50 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद शहरामध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या) न्याय नगर, गारखेडा (2), टाऊन हॉल (1), सईदा कॉलनी, जटवाडा रोड (3), कैलास नगर (4), राम नगर, एन-2, सिडको (4), नारळीबाग (1), गौतम नगर, जालना रोड (1), संभाजी कॉलनी, सिडको (1), महेश नगर (1), जुना बाजार (1), एमजीएम परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), शकुंतला नगर, शहानूरवाडी (1), औरंगपुरा (2), आशियाद कॉलनी, बीड बायपास रोड (1), वडगाव कोल्हाटी (2), अब्दाशहा नगर, सिल्लोड (1), आरेफ कॉलनी (1), कटकट गेट (1), एन-8 सिडको (1), एन-2 सिडको (1), समता नगर (1), अन्य (3) व गंगापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 17 महिला आणि 20 पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) आज हुसेन कॉलनी दहा, सादात नगर पाच, संजय नगर तीन, सिलक् मिल कॉलनी दोन, सदानंद कॉलनी, राम नगर, पुंडलिक नगर, भीमनगर, संभाजी कॉलनी, चाऊस कॉलनी, न्याय नगरातील प्रत्येकी एक असे एकूण 27 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, असे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले.
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आज सिल्क मिल कॉलनीतील दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या घाटीमध्ये 79 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. यामध्ये दहा जणांची प्रकृती गंभीर, 69 जणांची प्रकृती सामान्य आहे. आज सकाळी 8.10 वाजता न्याय नगर, एन-8 सिडकोतील 63 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना पूर्वीपासून उच्च रक्तदाबाचा आजार होता. तसेच 51 वर्षीय टाऊन हॉल येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा दुपारी चार वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने घाटीमध्ये आतापर्यंत 45 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. मिनी घाटीमध्ये एक आणि खासगी रुग्णालयात चार असे एकूण पाच कोरोनाबाधितांचाही मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 50 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याचेही प्रशासनाने कळवले आहे.