जालना: जालना शहरात आज सोमवारी पुन्हा दोन संशयित रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यात जिल्हा सरकारी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेसह राज्य राखीव दलाच्या जवानांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.
शहरातील नूतन वसाहत भागात राहणारी एक महिला जिल्हा रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. या महिलेसह मालेगाव येथून बंदोबस्त करून परतलेल्या व सध्या जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात आलेल्या एका जवानाच्या लाळेचे नमुने काल प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते. याचा अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला असून दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तेरावर पोहचल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने चिंता वाढली आहे.