औंरगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज 35 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये 14 महिला आणि 21 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1365 एवढी झाली आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या) आहे. बायजीपुरा (1), मिसारवाडी (1), वाळूज महानगर एक, बजाज नगर (1), संजय नगर (1), शहागंज (1), हुसेन कॉलनी (1), कैलास नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (2), उस्मानपुरा (1), इटखेडा (1), एन-4 (3), नारळीबाग (2), हमालवाडी (4), रेल्वे स्टेशन परिसर (2), सिटी चौक (1), नाथ नगर (1), बालाजी नगर (1), साई नगर सिडको एन सहा (1), संभाजी कॉलनी, एन सहा (2), करीम कॉलनी रोशन गेट (1) अंगुरी बाग (1), तानाजी चौक, बालाजी नगर (1), एन अकरा हडको (1), जय भवानी नगर (2), अन्य (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.