आठवडाभरात १४० गुन्हे दाखल; १६७ जणांना अटक, तर १४६ जणांना नोटीस

मुंबई: महाराष्ट्रात २४ ते ३१ ऑक्टोबरदम्यान १४० गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी १६७ जणांना अटक, तर १४६ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. शहाणे असाल, तर मराठ्यांवर गुन्हे दाखल करू नका. गुन्हे मागे घ्यावेत. गुन्हे दाखल झाल्याने सरकारविरूद्ध रोष निर्माण होत आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले.

माजी मंत्री बच्चू कडू यांनी जरांगे-पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. त्यानंतर जरांगे-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला

सरकार ६ कोटी मराठ्यांवर गुन्हे दाखल करणार आहे का? गुन्हे दाखल केल्यानं लोकांमध्ये सरकारविषयी रोष निर्माण होत आहे. अधिकाऱ्यांनी विनाकारण त्रास दिला, तर न्यायालयामार्फत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. गुन्ह्यांच्या भीतीमुळे आरक्षणाच्या लढ्यापासून मागे हटायचं नाही. हे खोटे गुन्हे आहेत,” असा आरोप जरांगे-पाटलांनी केला.

न्याय मिळेपर्यंत पाणी पिणार नाही. पुरावे असूनही सरकार मराठ्यांना जाणुनबुजून आरक्षण देत नाही. काही जातींना पुरावे नसताना आरक्षण दिलं. आपल्याला कठोर लढाई लढावी लागणार आहे. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार राहिल,” असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *