पुणे: पुणे विभागातील 8 हजार 862 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 हजार 077 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 575 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 286 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.95 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 10 हजार 973 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 6 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 596 आहे. कोरोनाबाधित एकूण 465 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 259 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.99 टक्के आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 452 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 330, सातारा जिल्ह्यात 15, सोलापूर जिल्ह्यात 92, सांगली जिल्ह्यात 6 तर कोल्हापूर जिल्ह्यात 9 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील 704 कोरोनाबाधित रुग्ण असून 448 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 227 आहे. कोरोनाबाधित एकूण 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 1504 कोरोनाबाधित रुग्ण असून 805 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 567 आहे. कोरोनाबाधित एकूण 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 192 कोरोनाबाधित रुग्ण असून 103 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 83 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 704 कोरोनाबाधित रुग्ण असून 594 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 102 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.