# पुण्यात दीड हजारांवर कोरोनाबाधित; 230 जणांना डिस्चार्ज, एकूण 85 रुग्णांचा मृत्यू.

 

पुणे: पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1538 झाली आहे. 230 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1223 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1702 झाली आहे. विभागातील 264 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1344 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 80 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. आजपर्यंत विभागामध्ये एकूण 17747 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 16908 चा अहवाल प्राप्त आहे. 839 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 15151 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 1702 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 59,91,999 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2,29,48,395 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1375 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *