# औरंगाबाद जिल्ह्यात आज 47 रुग्णांची वाढ; एकूण कोरोनाबाधित 1696.

 

औंरगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 47 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1696 झाली आहे. दरम्यान, 1085 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एन-चार ‍सिडको परिसरातील कोरोनाबाधित 74 वर्षीय पुरूष रुग्णाचा आज सकाळी 6.30 वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण 85 जणांचा मृत्यू झाला आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या)  जसवंतपुरा (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), खोकडपुरा (2), अजिंक्य नगर (1), समता नगर (2), समृद्धी नगर, एन-4 सिडको (1), जय भवानी नगर (1), लेबर कॉलनी (2), मिल कॉर्नर (4), हमालवाडी, रेल्वे स्टेशन (1), भावसिंपुरा (2), शिवशंकर कॉलनी (5), पिसादेवी रोड (1), कटकट गेट (1), सिल्लेखाना नूतन कॉलनी (1), बारी कॉलनी (1), उल्का नगरी (1), एन-सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1), शरीफ कॉलनी (1), कैलास नगर (4), स्वप्न नगरी, गारखेडा परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), पुंडलिक नगर रोड, गारखेडा (1), विद्यानिकेतन कॉलनी (1), सुराणा नगर (2), अन्य (3) आणि यशवंत नगर, पैठण (3), अब्दुलशहा नगर, सिल्लोड (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 21 महिला आणि 26 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

खासगी रुग्णालयात एकाचा मृत्यू:  औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एन-चार ‍सिडको परिसरातील कोरोनाबाधित 74 वर्षीय पुरूष रुग्णाचा आज सकाळी 6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 68, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 16, मिनी घाटीमध्ये 1 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 85 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *