# पुणे विभागात आज 603 रूग्णांची वाढ; एकूण 18,532 कोरोनाबाधित.

पुणे: पुणे विभागातील 11 हजार 528 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजार 532 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 6 हजार 213 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 791 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 340 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.21 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.27 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 14 हजार 725 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 9 हजार 2 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 159 आहे. कोरोनाबाधित एकूण 564 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 320 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.13 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.83 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 603 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 477 , सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 100, सांगली जिल्ह्यात 5 तर कोल्हापूर जिल्ह्यात 2 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 800 रुग्ण असून 613 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 148 आहे. कोरोनाबाधित एकूण 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 5 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 79 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 754 आहे. कोरोनाबाधित एकूण 172 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 271 कोरोनाबाधित रुग्ण असून 160 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 103 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित 731 रुग्ण असून 674 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 49 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *