औरंगाबाद: शहरात आज सायं ६ वाजेपर्यंत संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्या १९० वाहनधारकांची वाहने ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाई सिडको- ६९, शहर विभाग- ७३, छावणी- १७, वाळूज- ३१ एकूण १९० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून १८८ कलमाअंतर्गत २५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असल्याचे सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ नागनाथ कोडे यांनी सांगितले.