# राज्यात कोरोनाचे एकूण रुग्ण १९०६३; बरे झाल्याने ३४७० रुग्णांना डिस्चार्ज, आज ३७जणांचा मृत्यू.

 

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ६३ झाली आहे. आज १०८९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १६९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३४७० रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज शुक्रवारी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख १२ हजार ३५० नमुन्यांपैकी १ लाख ९२ हजार १९७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर १९ हजार ६३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ३९ हजार ५३१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ७३१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील २५, पुण्यातील १०, जळगाव जिल्ह्यात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १९ पुरुष तर १८ महिला आहेत. आज झालेल्या ३७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत, तर १६ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३७ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: १२,१४२ (४६२)
ठाणे: १०१ (२)
ठाणे मनपा: ७२४ (८)
नवी मुंबई मनपा: ७१६ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २८४ (३)
उल्हासनगर मनपा: १५
भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा भाईंदर मनपा: १९२ (२)
पालघर: ४६ (२)
वसई विरार मनपा: १९४ (९)
रायगड: ८१ (१)
पनवेल मनपा: १३२ (२)
*ठाणे मंडळ एकूण: १४,६४८ (४९७)*
नाशिक: ४७
नाशिक मनपा: ६०
मालेगाव मनपा: ४५० (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ८२ (१२)
जळगाव मनपा: १४ (२)
नंदूरबार: १९ (१)
*नाशिक मंडळ एकूण: ७५७ (३२)*
पुणे: ११० (४)
पुणे मनपा: १९३८ (१३२)
पिंपरी चिंचवड मनपा: १२९ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: १७९ (१०)
सातारा: ९४ (२)
*पुणे मंडळ एकूण: २४५६ (१५१)*
कोल्हापूर: १० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
सिंधुदुर्ग: ५
रत्नागिरी: १७ (१)
*कोल्हापूर मंडळ एकूण: ७३ (३)*
औरंगाबाद:५
औरंगाबाद मनपा: ४१८ (१२)
जालना: १२
हिंगोली: ५८
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
*औरंगाबाद मंडळ एकूण: ४९५ (१३)*
लातूर: २५ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २९ (२)
*लातूर मंडळ एकूण: ६१ (३)*
अकोला: ९ (१)
अकोला मनपा: ११२ (९)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ७६ (१०)
यवतमाळ: ९५
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
*अकोला मंडळ एकूण: ३२१ (२२)*
नागपूर: २
नागपूर मनपा: २१० (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: २१८ (२)*
इतर राज्ये: ३४ (८)
*एकूण: १९ हजार ६३ (७३१)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *